अद्ययावत: ऑगस्ट २०२६ · MahaDBT शिष्यवृत्ती हंगाम
MahaDBT वर लॉगिन किंवा सबमिट करताना Face Authentication Failed किंवा Biometric Failed येत असेल तर पहिले तंत्रज्ञान तपासा — अनेकदा सोप्या गोष्टीमुळे अडते.
फक्त mahadbt.maharashtra.gov.in वापरा. आम्ही शासकीय विभाग नाही.
आम्ही प्रथम हे ४ तपासतो
- प्रकाश: खूप अंधार किंवा मागून तेजस्वी प्रकाश — फेस स्कॅन फेल
- कॅमेरा परवानगी: ब्राउझर / अॅपला कॅमेरा allow केला आहे का
- आधार लिंक मोबाईल: OTP येतो का — UIDAI साइटवर लिंक तपासा
- जुना ब्राउझर: Chrome अपडेट करा; कधीकधी Firefox/Safari बदला
पायऱ्या — पुन्हा प्रयत्न
- मोबाईल डेटा बंद — WiFi वर स्थिर कनेक्शन
- MahaDBT अॅप (जर उपलब्ध) किंवा डेस्कटॉप Chrome
- Face scan — चेहा स्पष्ट, चष्मा/टोपी काढा (स्क्रीन सूचना वाचा)
- फेल झाल्यास OTP पर्याय असेल तर वापरा
- अजून फेल — Biometric centre / प्रक्रिया अपडेट वाचा
Face Auth ≠ Invalid दाखला
लॉगिन Biometric फेल = तंत्रज्ञान/आधार. कागदपत्र “Invalid Income Certificate” = दाखला त्रुटी — वेगळे उपाय.
कधी विद्यालय/कॉलेज?
योजेनुसार विद्यालय स्तरावर पडताळणी लागते — अर्ज क्रमांक घेऊन थेट संस्था विचारा.
अस्वीकरण: सरकारी दोस्त शासकीय साइट नाही. दुरुस्ती: [email protected]