अद्ययावत: ऑगस्ट २०२६ · शिष्यवृत्ती हंगाम
उत्पन्न दाखला (Income Certificate) MahaDBT आणि EWS योजनांसाठी सर्वात जास्त “Invalid” येतो. अर्ज करण्यापूर्वी कुटुंब उत्पन्न कसे मोजायचे ते समजून घ्या — ते महत्त्वाचे.
अर्ज आपले सरकार वर. आम्ही शासकीय विभाग नाही.
पाच त्रुटी जी आम्ही वारंवार पाहतो
१. जुना दाखला: २०२४ चा दाखला २०२५–२६ अर्जात — नाकारले जाते. नवीन काढा.
२. कुटुंब उत्पन्न चुकीचे: फक्त पित्याचे उत्पन्न लिहिले — सहसा संपूर्ण कुटुंब मोजायचे. EWS/उत्पन्न नियम वाचा.
३. बारकोड वाचत नाही: स्कॅन कमी गुणवत्ता — Invalid Income Certificate मार्गदर्शन.
४. नाव जुळत नाही: उत्पन्न दाखल्यावर नाव आणि MahaDBT नाव वेगळे.
५. वैद्यकीय/शिक्षण दाखला उत्पन्नाऐवजी: वेगळे दाखले — उत्पन्न दाखला हवा.
अर्ज सामान्य पायऱ्या
- आपले सरकार लॉगिन
- “उत्पन्न दाखला” सेवा
- कुटुंब उत्पन्न तपशील — खरी माहिती
- कागदपत्र — राहण्याचा दाखला, आधार, फोटो (यादी पोर्टलवर)
- शुल्क आणि मागोवा
उत्पन्न दाखला ≠ NCL ≠ EWS
तीन वेगळे दाखले — एकमेकांचा पर्याय नाही. EWS साठी EWS मार्गदर्शन वाचा.
अस्वीकरण: सरकारी दोस्त शासकीय साइट नाही. दुरुस्ती: [email protected]