MahaDBT अर्ज स्थिती कशी तपासावी? Scrutiny, Approved, Redeemed — २०२५–२६

अद्ययावत: ऑगस्ट २०२६ · MahaDBT शिष्यवृत्ती / विद्यावेतन हंगाम

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

MahaDBT वर लॉगिन केल्यावर Application Status वेगवेगळे दिसते — Scrutiny, Approved, Redeemed, Send Back, Rejected. एकाच शब्दावर घाबरू नका; अर्थ वाचा, नंतर पाऊल ठेवा.

स्थिती फक्त mahadbt.maharashtra.gov.in वर तपासा. आम्ही शासकीय विभाग नाही.

स्थिती आणि अर्थ (सोप्या भाषेत)

Scrutiny / Under Scrutiny: कागदपत्र तपासणी चालू — सहसा काही दिवस थांबा. “Clock error” असेल तर Scrutiny clock मार्गदर्शन वाचा.

Send Back: काही त्रुटी — दुरुस्त करून पुन्हा सबमिट. Rejected vs Send Back लेख वाचा.

Approved: मंजूर — पैसे येण्याची प्रक्रिया सुरू. तारीख विभाग/योजेनुसार.

Redeemed: पैसे प्रक्रिया झाली — बँक खात्यात येण्यास वेळ लागू शकतो. पैसे न आल्यास Redeemed पैसे नाही मार्गदर्शन.

Rejected: नाकारले — कारण वाचा; काही वेळा पुन्हा अर्ज शक्य.

स्थिती कुठे दिसते?

  1. mahadbt.maharashtra.gov.in लॉगिन
  2. “My Applied Scheme” / “अर्ज केलेली योजना”
  3. योजना निवडा — Status column
  4. Details / View — तपशील आणि कारण

स्थिती बदलत नाही तर?

  • Scrutiny १५+ दिवस — विद्यालय/कॉलेज स्तरावर कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली का तपासा
  • Approved पण पैसे नाही — बँक IFSC, Aadhaar-Bank link तपासा
  • Send Back — फक्त दाखले दुरुस्त करा, नवीन पैसे भरू नका (योजेनुसार)

आमची सल्ला

दररोज १० वेळा लॉगिन करणे गरजेचे नाही. स्क्रिनशॉट घ्या — Status + Date. विद्यालय कार्यालयात समस्या असेल तर अर्ज क्रमांक दाखवा.

अस्वीकरण: सरकारी दोस्त शासकीय साइट नाही. स्थिती अर्थ योजेनुसार बदलू शकतात. दुरुस्ती: [email protected]

नमस्कार, मी मोहम्मद सलीम शेख, नवी मुंबई हून डिजिटल क्रिएटर आणि 'Sarkari Dost' चा संस्थापक आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शासकीय योजना आणि नोकरीच्या संधींबद्दल सोप्या मराठी भाषेत अचूक मार्गदर्शन करणे हे माझे मुख्य ध्येय आहे. मी नेहमीच अधिकृत आणि विश्वसनीय स्त्रोतांद्वारे (Authentic Sources) सखोल संशोधन करून माहिती देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमच्यापर्यंत फक्त खरी माहिती पोहोचेल. वाचकांसोबत विश्वासाचे नाते निर्माण करत, तुमच्या करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर एक खंबीर 'दोस्त' म्हणून सोबत राहण्यासाठी मी कटिबद्ध आहे!

Leave a Comment