लाडकी बहीण योजना मे 2025 हप्ता: खात्यात 3000 रुपये कधी जमा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

by SarkariDost.com
May 30, 2025
लाडकी बहीण योजना मे 2025 हप्ता: खात्यात 3000 रुपये कधी जमा होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Ladki bahin Yojana 2025 Installment

Ladki Bahin Yojana May 2025 Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मे 2025 चा हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा लाखो महिलांना आहे. अनेक लाभार्थी महिलांनी विचारणा केली आहे की यंदाचा मे महिन्याचा ₹1500 चा हप्ता कधी जमा होणार आहे. यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 3.37 कोटी रुपयांच्या योजनेसाठी आवश्यक फाईलवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे लवकरच लाडकी बहीण योजनेच्या रकमा महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मे आणि जूनचा हप्ता एकत्र जमा होणार?

योजनेच्या आधीच्या ट्रेंडनुसार, मागील काही महिने महिलांच्या खात्यात हप्ते शेवटच्या आठवड्यात जमा झाले आहेत. मे महिना संपण्यास काहीच दिवस शिल्लक असल्याने, हप्ता जून महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. जर मे महिन्यात रक्कम जमा झाली नाही, तर महिलांच्या खात्यात एकत्र 3000 रुपये (मे + जून) मिळण्याची शक्यता आहे.

पडताळणीमुळे काही अर्ज बाद होण्याची शक्यता

राज्य सरकारकडून अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अयोग्य माहिती देणाऱ्या अर्जदार महिला अपात्र ठरवण्यात येऊ शकतात. बनावट लाभार्थ्यांना टाळण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाच्या हप्त्यात काही महिलांना रक्कम मिळण्यास अडथळा येऊ शकतो.

हे पण वाचा » थेट मुलाखतीद्वारे, नवी मुंबई येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ या पदांसाठी भरती!

मे महिन्याचा हप्ता अजून अधिकृतरित्या जाहीर झालेला नाही. त्यामुळे तो पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी एप्रिल हप्ता वेळेत जमा झाला होता, पण मे महिन्याचा हप्ता अजूनही थांबलेला असल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलांना कधी मिळणार पैसे?

सूत्रांच्या माहितीनुसार, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा वटपौर्णिमेच्या आसपास हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात एकत्र 3000 रुपये येण्याची शक्यता असल्याने, लाभार्थींनी अधिकृत घोषणेसाठी प्रतीक्षा करावी.

हे पण वाचा » नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२५ – ६२० विविध पदांसाठी अर्ज करा | १०वी / १२वी / पदवीधर नोकऱ्या

Important Links
Age CalculatorClick Here
Join ChannelsTelegram
 WhatsApp